Posts

शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साकोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे यांना शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. साकोली : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साकोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे यांना शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणे मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला पाठविणे, प्रलंबित वैद्यकीय प्रतीपूर्ती बिल व इतर देयके निकाली काढणे, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करणे, उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी ताबडतोब मिळणे, सेवापुस्तीकेमध्ये गटविम्याच्या तसेच जीपीएफच्या नोंदी घेणे, सेवापुस्तीका अपडेट करण्यासाठी केंद्रनिहाय कॅप घेणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नवीन जीपीएफ नंबर मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठविणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले. मागण्यांची पुर्तता न झाल्यास येत्या काळात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंड

भंडारा जिल्ह्यातल्या विरली गावाने केला प्लास्टिक बंदीचा निर्धार

उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. भंडारा : उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. ग्रामसभेमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव घेवून यावर शिक्कामोर्तब करण्यात येवून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर २६ जानेवारी पासूनच गावात होऊ घातलेल्या भागवत सप्ताहात महा प्रसादासाठी उपयोगात येणा-या प्लास्टीक पत्रावळीचा वापरही टाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गावात भविष्यात होणाऱ्या लग्न समारंभात प्लास्टिक पत्रावळीचा वापर होऊ नये याकरिता विवाह निश्चित करणाऱ्या कुटूंबांसोबत संवाद साधून वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय सरपंच लोकेश भेंडारकर व त्यांच्या ग्रामपंचायत चमूने घेतलेला असून २६ जानेवारीला तसा ठर